Vishwayogdarshan Kendra Miraj-Sangli

Awards

या गजाननाच्या नगरी मध्ये 2001 साली विश्व योगदर्शन केंद्र मिरज सांगली याची स्थापना योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांनी केली. गेली अनेक वर्षे या संस्थेचे काम अविरत चालू आहे. ‍ या संस्थेमध्ये मुख्यतः अष्टांग योग व हठयोग यावर जास्त भर देऊन साधकांना आसनां सह अत्यंत सखोल दृष्ट्या मार्गदर्शन तज्ञ योग शिक्षकांकडून केले जाते.

आत्ताच्या या घडीला विश्व योग दर्शन केंद्राच्या अध्यक्षपदी श्रीमती जयश्रीताई पाटील या समर्थपणे केंद्राची धुरा सांभाळत आहेत. केंद्रामार्फत दररोज सर्वांसाठी योग वर्ग, महिला योग शिक्षकांकडून महिलांसाठी विशेष योग, लहान मुलांसाठी सुद्धा विशेष योग वर्ग व त्यामध्ये स्पर्धात्मक आसनांचे प्रशिक्षण दिले जाते. अनेक योग शिबिरांचे व स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते. तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इन योगशिक्षक ,वाय .सी. बी यासारख्या परीक्षांची तयारी केंद्रामार्फत करून घेतली जाते व परीक्षांचेही आयोजन केले जाते.

सांगलीमध्ये योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पुढाकार घेणारे स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामध्ये योगाचा प्रचार व प्रसार करणारे व योगासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला योग रत्न यासारख्या पुरस्काराने गौरवले जाते. त्याचप्रमाणे योग भूषण योग, योग संघटक व वर्षभरात ज्या योगसाधकांनी उत्तम काम केले आहे त्यांना आदर्श योग शिक्षक , योग मार्गदर्शक व योग स्पोर्ट्स टीचर यासारख्या पुरस्काराने गौरवले जाते.

आतापर्यंत योगातील अनेक मान्यवरांना योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये
1. योगाचार्य सदाशिवराव मंडलिक योग विद्या धाम नाशिक
2. योगाचार्य कैलासवासी सदाशिव राव निंबाळकर योग विद्यानिकेतन वाशी
3. डॉक्टर मंथन गारोटे कैवल्यधाम लोणावळा
4. डॉक्टर उल्का नातू घंटाळी मित्र मंडळ ठाणे
5. डॉक्टर सतीश पाठक कैवल्यधाम लोणावळा
6. कैलासवासी डॉक्टर धनंजय गुंडे अस्थिरोग तज्ञ कोल्हापूर
7. डॉक्टर संमप्रसाद योगी डायरेक्टर विनोद योगा क्लिनिक पुणे
8. डॉक्टर मकरंद गोरे
9. श्रीमती हंसाजी बेन योगा इन्स्टिट्यूट सांताक्रुज मुंबई
10. श्री वसंत चंदात्रे
11. श्री अशोक अग्रवाल
12. डॉक्टर मिलिंद मोडक अस्थिरोग तज्ञ पुणे
13. श्री बापूजी कुलकर्णी
14. श्री प्रदीप घोलकर षट्क्रिया तज्ञ.
15. कैलासवासी श्री वसंतराव पाटील पतंजली योग केंद्र सांगली
अशा अनेक विभूतींना योग रत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी केंद्रामार्फत चार ते पाच दिवस अनेक योग शिबिरांचे आयोजन केले जाते. ज्याला समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो.

2019 रोजी आलेल्या कोविडच्या महामारी सुद्धा आमच्या योग शिक्षकांनी ऑनलाइन योग वर्ग घेऊन सर्व समाजातील लोकांना शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवता येईल व कोरोनावर कोणत्या योगिक क्रियाने मात आपण करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. केंद्रातील काही तज्ञ योगशिक्षकानी कोरोनाच्या रुग्णांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन करून आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली.

विश्व योगदर्शन केंद्राने योग आणि योगाभ्यासातील नियमांचे काटेकोर पालन करून समाजातील सर्व स्तरातील लोकांना योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यात एक अग्रगण्य भूमिका घेतली आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये शेकडो योग शिक्षक या केंद्राने निर्माण केले आहेत व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक पुरस्कारही मिळवलेले आहेत.

अशी ही योगाचे ध्यास घेतलेल्या संस्थेला 2025 साली 25 वर्षे पूर्ण होत आहेत.

योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांनी विश्वयोग दर्शन केंद्र मिरज व सांगली याची स्थापना ही मनामध्ये एक संकल्पना करून केली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक मिळवलेली आहे. आपल्याला असलेले योगाचे ज्ञान हे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावे असे त्यांनी ठरवले आपला समाज शरीराने व मनाने निरोगी झाला पाहिजे या एका ध्येयाने ते पेटून उठले व त्यांनी या केंद्राची स्थापना केली.त्यासाठी त्यांनी एक चतु:सूत्री तयार केली.

योग जाणावा
योग करावा
योग जगावा
योग घरोघरी पोहोचवावा.
आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थापनेपासून आतापर्यंत या चतु:सुत्रीप्रमाणेच कार्य होत आहे.